Friday, 18 January 2019

बहुचर्चित सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अहमदनगरमधील सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालायाने निर्णय दिला. दोषींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड दोषींकडून वसूल केल्यानंतर, त्यातील 10 हजार रुपयांची रक्कम पीडितांच्या कुटुंबीयांना दिली जाईल.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) या सोनईतील गणेशवाडीत राहणाऱ्या तिघांची हत्या केली होती.

सोनई हत्याकांडातील एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे, सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला.

विशेष म्हणजे, फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य