Monday, 10 December 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद;न्यायमूर्तींनी मांडली आपली व्यथा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायमूर्तींची पत्रकार परिषद घेण्यात आली. दुपारी 12.15 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पत्रकारांसमोर आले आहेत. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली व्यथा मांडली. अनेक प्रस्न उपस्थित केले. विशेष म्हणजे जे चार न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेत आहेत ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या परवानगीनंतरच ते पत्रकार परिषद घेत आहेत. न्यायमूर्ती चेल्लमेश्वर यांच्यासह तीन न्यायमूर्तींनी या पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली.  सुप्रीम कोर्टातल्या चार न्यायमूर्तींची पत्रकार परिषद जस्टीस लोया प्रकरणाशी संबंधित असून याबाबत त्यांनी सकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेतली होती. पण, समाधान न झाल्याने ते मीडियासमोर आले.

न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे :

 

न्यायव्यवस्था टिकली नाही तर, लोकशाही टिकणार नाही

सुप्रिम कोर्टाचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्याने न्यायमूर्तींची हतबलता

काही महिन्यांपासून कोर्ट प्रशासनाचे काम नीट नाही

लोकशाहीत न्यायव्यवस्थेची स्वयतत्ता महत्त्वाची

यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा गोष्टी घडल्या नाहीत

न्यायमूर्तींनी या पत्रकार परिषदेतून न्यायव्यवस्थेवर टिका करत आपली नाराजी व्यक्त केली. आणि न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य