Monday, 22 October 2018

शिवरायांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ आली होती; म्हणून ते मुंबईतही आले पण... भाजप नेत्याचे खळबळ वक्तव्य

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

शिवाजी महाराजांच्या वंशजावर म्हणजेच भोसल्यांच्या गादीवर हिरा विकण्याची वेळ आली होती. त्यांनी मुंबई गाठून हिऱ्याचा लिलावही सुरू केला. मात्र, माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याला हे बघवले नाही. त्याने लिलाव थांबवून भोसले कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत केली, असा दावा करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी औरंगाबादेत नव्या वादाला तोंड फोडले.

औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन जाजू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

माहेश्वरी समाजाचे मोठेपण सांगताना त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, हिरा विकण्यासाठी गेलेला शिवाजी महाराजांचा ‘तो’ वारस कोण हे त्यांनी सांगितले नाही. फक्त ‘भोसले’ असा उल्लेख केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य