Friday, 19 October 2018

लग्नाच्या मंडापातूनच नवरी बॉयफ्रेंडसोबत पळाली तरी नवरदेवाचा विवाह झाला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा

 

नवरी मिळे नवऱ्याला चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. असंच काहीसं वर्ध्यात घडलंय. पण, वर्ध्यातील या नवऱ्याला अगदी नाट्यपद्धतीनं दुसरीचं नवरी मिळालीय.

आर्वीच्या गजाननचा विवाह यवतमाळच्या मुलीशी ठरला होता. मात्र, ऐन लग्नच्या काही वेळा पूर्वीच वधूनं आपल्या प्रियकारासोबत पलायन केल्यानं. दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आणि सगळ्यांसमोर वराच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

यावेळी दोन्ही कुटूंबातील लोकांनी विचार विनिमय करून उपाय काढला आणि वरासाठी मलकापुरच्या ज्योती आगाशेची लग्नासाठी निवड केली.

नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादानं रात्री साडे अकराच्या सुमारास दोघांचा विवाह पार पडला आणि अखेर नवऱ्या पहिली नाही पण दुसरी नवरी मिळालीच.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य