Saturday, 21 July 2018

इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, मनसेच्या 6 नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंचं रोखठोक प्रत्युत्तर

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंंबई

मुंबई महापालिकेत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेत सहभागी झाले आहेत. 

शिवसेनेत सामील झालेले मनसेच्या सहा नगरसेवकांना सोबत घेवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

मनसे नगरसेवकांनी शिवसेनेसोबत येण्याबाबच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. 

अर्चना भालेराव (प्रभाग क्र. 126), परमेश्वर कदम(प्रभाग क्र. 133), अश्विनी मतेकर(प्रभाग क्र. 156), दिलीप लांडे(प्रभाग क्र. 163), हर्षल मोरे(प्रभाग क्र. 189) आणि दत्ताराम नरवणकर(प्रभाग क्र. 197) या मनसे नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी यांच्या हातावर शिवबंधन बांधले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

- ही फोडाफोडी नाही, ही घरवापसी

- पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा मातोश्रीवर म्हणजेच शिवसेनेत परतेल

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सहा जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आलेत

- फोडाफोडी तेव्हा झाली होती, आज ते सहा जण स्वगृही परतले आहेत

- कोणाला फटका द्यायचा म्हणून नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं नाही, त्यांनीच सेनाप्रवेशाची इच्छा व्यक्त केली

- इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, फोडाफोडीच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंचं रोखठोक प्रत्युत्तर

- एका दिवसांत किती जमवाजमाव करु शकतो यावरुन शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज आला पाहिजे

- आम्हाला मित्र म्हणतात मग भाजपच्या पोटात दुखण्याचे कारण काय? 

- भाजप आम्हाला मित्रपक्ष मानत असेल तर त्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावे

- घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये

- भांडुपची पोटनिवडणूक भाजपने नाही तर सहानुभूतीने जिंकली आहे, मोदी लाट आता ओसरली आहे

- नांदेडमधील जनतेच्या भावनांचा आदर, काँग्रेस आणि अशोक चव्हाणांचं अभिनंदन

 

 

 

loading...

Top 10 News