Monday, 24 September 2018

आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांडं बंद करा असे आदेश निघायचेच बाकी आहे – उद्धव ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रो तीन प्रकल्पाची पाहाणी केली. यावेळी मेट्रो-3चे अधिकारी पुरेशी काळजी घेत नसल्यामुळे काम सुरु असताना हादरे बसतात, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

तर, निसर्गाची हानी होत असले तर सेनेचा विरोध कायम असणार आणि पाहणी केल्यानंतरच आरेबाबत मत व्यक्त करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

तसेच मेट्रोसाठी पालिकेची परवानगी लागणार नाही असं होऊन चालणार नसल्याचंही ते म्हणालेत.

आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांडं बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी असल्याचं ते ही काढा हवं तर अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली.

शांततेचा अतिरेक झाला तर एकदिवस असंतोषाचा स्फोट होईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य