Wednesday, 19 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 260918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन आधार कार्डच्या वैधानिकतेवर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल, सुरक्षेच्या मुद्यावर होणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयावर सर्वांचं लक्ष

#हेडलाइन पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूयचा 23वा बळी, उस्मानाबादच्या 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात पत्नीच्या मृत्यूच्या 13 दिवसानंतर पती वाल्मिक कांचन यांचा मृत्यू, ऊरळी कांचन परिसरात एकच खळबळ

#हेडलाइन पुण्यात गणेश विसर्जनावेळी न्यायालयाचं उल्लंघन करून डीजे वाजवल्याप्रकरणी 101 गुन्हे दाखल, तर 65 ठिकाणी डीजेचं साहित्य जप्त

#हेडलाइन ज्येष्ठ गायिका अनुऱाधा पौडवाल यांना विरारमध्ये एका बिल्डरने फसवले, एकच फ्लॅट अनेकांना विकून लावला लाखोंचा गंडा

#हेडलाइन 20 वर्षांपासून पक्की घरं बांधून राहणाऱ्या जागेवर कापसाची लागवड दाखवत बोंडअळीचे लाटले अनुदान, बुलडाणाच्या हिंगणा कारेगावातील धक्कादायक प्रकार, अनुदान लाटल्याची कागदपत्रं 'जय महाराष्ट्र'च्या हाती

#हेडलाइन स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करत मांसहार केल्याप्रकरणी जिंतूर बंदची हाक, हिंदूत्ववादी संघटनांकडून अंनिसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

#हेडलाइन ग्रामीण भागातील मुलींना मिळणार बारावीपर्यंत एसटीचा मोफत प्रवास, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

#हेडलाइन भाजपा कार्यकारिणीची मुंबईत आज बैठक, बैठकीत होणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं मास्टर प्लॅनिंग, विरोधक आणि मित्रपक्षांबाबतही होणार मोर्चेबांधणी

#हेडलाइन कार अंगावरून जाऊनही बचावला मुलगा, अंगावर काटे आणणारा प्रकार सीसीटीव्हीत कैद, कारचालक महिला पसार

#हेडलाइन कल्याणमधील 104 वर्ष जुन्या पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल ठरला होता धोकादायक

loading...