Saturday, 15 December 2018

रवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृतिदिन,ट्वीटरवर यांनी वाहिली श्रद्धांजली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

साहित्यिक, चित्रकार, रवींद्र संगीताचा प्रणेता, प्रतिभावंत कवी, शिक्षणतज्ज्ञ असे हे नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा आज 77 स्मृतिदिन. 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले होते. 

‘गीतांजली’ ला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते ‘विश्ववंद्य कवी’ ठरले, तर त्यांच्या ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीताचा मान मिळाल्याने ते राष्ट्रकवी झाले. 

रवींद्रनाथाना आपण ओळखतो ते या तीन गोष्टींमुळे

  • नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आणि एकमेव भारतीय कवी 
  • नवीन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार आणि अवलंब करणारे शिक्षणतज्ज्ञ 
  • आपल्या राष्ट्रगीताचे जनक आणि संगीतकार म्हणून!

रवींद्र टागोर यांचे कामगिरी

  • १८८१ मध्ये ‘वाल्मिकी प्रतिभा’ हे आपले पहिले संगीत नाटक लिहिणा-या रवींद्रनाथांचे बंगाली आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होते.
  • बंगाली साहित्यक्षेत्रात कवी, कांदबरीकार, नाटककार म्हणून त्यांनी भरीव कार्य केले आहे.
  • ‘साधना’, ‘भारती’, ‘वंगदर्शन’ या मासिकांचे संपादन करणा-या रवींद्रनाथांचा स्वातंत्र्य चळवळीशीही निकटचा संबंध होता.
  • ‘शांतिनिकेतन’ व ‘विश्वभारती’ या त्यांनी स्थापन केलेल्या जगप्रसिद्ध संस्था.या शिक्षण संस्थांमुळे भारतीय शिक्षण क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
  • मानवतेचे पुरस्कर्ते असणा-या रवींद्रनाथांची समग्र साहित्यसंपदा ४० खंडात पसरली आहे.

 

loading...