Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @8.00am 020818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन परळीमधील मराठा आंदोलनाचा आज सोळावा दिवस, आज पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार

#हेडलाइन 58 मोर्चे काढून सरकारला जाग येत नसेल तर चर्चा करुन काय उपयोग, कोल्हापुरच्या श्रीमंत शाहू महाराजांचा टोला, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास नकार

#हेडलाइन ऍट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतूदी तशाच राहणार, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय़, विधेयक चालू अधिवेशनात मांडणार

#हेडलाइन मल्टिप्लेक्समालकांची मुजोरी सुरुच, खाद्यपदार्थांचे दर कमी करण्यास मल्टीप्लेक्स मालकांचा नकार, 2 दिवसांत सुधरा अन्यथा खळ्ळखट्याकसाठी तयार रहा मनसेच्या अमेय खोपकरांचा इशारा

#हेडलाइन पाकच्या पंतप्रधानपदासाठीच्या शपथविधीला इम्रान खानतर्फे भारताच्या माजी क्रिकेटपटूंना निमंत्रण तर अभिनेता आमीर खानलाही बोलावणं

#हेडलाइन रिझर्व्ह बँकेतर्फे रेपो रेटध्ये पाव टक्क्याची वाढ, होमलोन महागण्याची शक्यता

#हेडलाइन लोअर परेल जवळचा तो धोकादायक पूल पाडणार, पश्चिम रेल्वेचा निर्णय, पूल तोडण्यासाठी साडे सात कोटींचा खर्च

#हेडलाइन गणेश मंडळांच्या मंडपावरुन शिवसेना-मनसेचं 'राज'कारण, राज ठाकरेंच्या गिरगाव भेटीनंतर सेना नेते सुभाष देसाईंनी घेतली गणपती मंडळांची भेट

#हेडलाइन 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात, रायगड जिल्ह्यातील बंदरावर तयारीची लगबग, खवय्यांना चाखता येणार ताज्य़ा मासळीचा स्वाद

#हेडलाइन इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी अश्विनच्या फिरकीची जादू, दिवसअखेर इंग्लंडच्या 9 विकेट्स गमावत 285 धावा

loading...