Saturday, 15 December 2018

#हेडलाइन्स @5.00pm 160618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @5.00 PM

#हेडलाइन ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये हिंसाचार... अनंतनागमध्ये हिंसक जमावानं सुरक्षा दलाच्या गाडीवर दगडफेक करत जवानांवर केला जीवघेणा हल्ला... जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर...

#हेडलाइन जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार... खांदेपालट होण्याची शक्यता.. आमदार संजय कुटेंची वर्णी लागण्याचीही चर्चा...

#हेडलाइन पगडीबाबत कोणाच्याही भावना दुःखवण्याचा हेतू नव्हता... वादानंतर पवारांचं स्पष्टीकरण...

#हेडलाइन भाजप आमदार प्रशांत बंब यांचा पोलीस उपनिरीक्षकाला दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल... कार्यकर्त्याची गाडी पकडल्यानं बंब संतप्त झाल्याची चर्चा...

#हेडलाइन बदलापूच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना दुर्दैवी मृत्यू... ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास ट्रेकर हर्षद आपटेंच्या जीवावर बेतला... 

#हेडलाइन मागासवर्गीय मुलांना नग्न करुन केलेल्या मारहाण प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री आठवले वाकडी गावात... राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितांची घेतली भेट...

#हेडलाइन औरंगाबादनंतर जळगावातही चोरीच्या संशयावरुन मारहाण... चाळीसगावात सहा तृतीयपंथीयांना बेदम मारहाण... मुले पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी दिला चोप...

#हेडलाइन संपत्तीसाठी पोटच्या मुलानं आईवडिलांना नारळ पाण्यातून दिलं विष... लातूरमधील धक्कादायक घटना... वडिलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू तर आरोपी मुलगा गजाआड...

#हेडलाइन देशभरात उत्साहात ईद साजरी... नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, तर येवल्यात छगन भुजबळांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा...

#हेडलाइन फिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी अर्जेंटिना विरुद्ध आइसलॅंड, फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशिया विरुद्ध नायजेरिया संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार...

loading...