Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @1.00pm 140518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 1.00 PM 

पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेवरून मनसे आणि राष्ट्रवादी आक्रमक... मनसेचं नवी मुंबईत तर राष्ट्रवादीचं दहिसरमध्ये आंदोलन...

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ... पेट्रोलचे दर पोहोचले ८२ रुपयांवर तर डिझेल ७० रुपये ४३ पैसे प्रतिलिटर...

विकासकामं करता येणार नसल्याने आता मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नाही, मात्र भाजपमध्येच राहणार... भोसरी प्रकरणात क्नीलचिट मिळालेल्या एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

औरंगाबाद दंगल प्रकरण हे सरकारचं अपयश.. अजित पवार यांची फेसबुक लाइव्हद्वारे सरकारवर टीका. तरऔरंगाबाद हिंसाचारात जखमी झालेल्या एसीपी गोवर्धन कोळेकरांना उपचारासाठी एअर अॅंबुलन्सने मुंबईत आणले.. 

दिवंगत अभिनेता इंदर कुमारचा निधनापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल... एका वर्षानंतर इंदरकुमारच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवडमध्ये कार चालवताना इन्स्टाग्राम लाइव्ह करताना कारचा अपघात… अपघातात कारचालक शिवम जाधवचा मृत्यू.. तर एक जण जखमी…

शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या सहा नगरसेकांना तात्पुर्ता दिलासा… कोकण आयुक्त डॉ.जगदीश पाटील रजेवर गेल्यानं सुनावणी पुन्हा ढकलली पुढे

टोलबंदीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर… मुंब्रा बायपास दुरुस्तीमुळे दोन महिने वाहतूक कोडीं होणार… त्यादरम्यान टोल बंद करण्याची राष्ट्रवादीची मागणी…

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस… पाठिंब्याचा प्रस्ताव शिवसेनेनं धुडकावला… भाजपची अडचण वाढली… आता चौरंगी लढतीवर शिक्कामोर्तब…  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वास राव यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात.. दोघेही सुखरूप मात्र गाडीचं मोठं नुकसान…

आज आयसी एसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल.. दुपारी 3 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल…

गोरेगावच्या आरे वसाहतीतील व्यायाम शाळेत घुसला बिबट्या...वनविभागाच्या बचाव पथकानं केली बिबट्याची सुटका...

जय महाराष्ट्रनं घेतला मुंबईतल्या चारही नद्यांचा मान्सूनपूर्व आढावा… नाले बनलेल्या नद्या कधी होणार पूर्वपदावरजनतेचा सवाल

पाकिस्तानची साखर विकू नका, अथवा विकतही घेऊ नका…अन्यथा कायदा हातात घेऊ…मनसेचा इशारा…तर राज ठाकरे चार दिवसांच्या रायगड दौऱ्यावर…

Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=0gfDBP71Ch8

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...