Sunday, 20 January 2019

#हेडलाईन्स @7pm 050518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 7.00 PM 
 
नागपूर शहरात वर्षाकाठी कोट्यवधींची वीज चोरी....  चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजना ठरल्या फोल..... 100 कोटींच्या वीज चोरीचा जय महाराष्ट्रवर खुलासा...

नाना पटोलेंसोबतचे मतभेद संपले... येणाऱ्या काळात एकत्र काम करु...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती....

मुख्यमंत्री सांभाळत असलेलं गृह खातं निष्क्रिय....भाजपा आमदार स्मिता वाघ यांचा सरकारला घरचा आहेर.....  अमळनेर पोलिस स्टेशनला टाळा ठोकण्याचा दिला इशारा

नगर जामखेड राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार गजाआड... उल्हास मानेला जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या... हत्येमागचं नेमकं कारण उघड होण्याची शक्यता

39 नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतरही गडचिरोलीत नक्षल्यांची दहशत सुरूच...  पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हुर्रेकसात तरुणाची हत्या... पांड़ुरंग पदावर गोळ्या झाडत, तीक्ष्ण हत्यारानं वार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार...दाखल केल्यानंतर तासाभरानं तपासल्यामुळं दगावला रूग्ण ....रूग्णाला कोण घेऊन आलं, याची माहिती रूग्णालयाकडंच नाही.

लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांनो सावधान... रेल्वे स्थानकात तत्काळ तिकिटांच्या रांगांचे होणार चित्रीकरण, कारवाईचा बडगा उभारला जाणार

पश्चिम रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला 26 वर्षे पूर्ण... महिला प्रवाशांसाठी 1992ला आली होती स्वतंत्र लोकल

ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमध्ये महिलेची प्रसूती... गोंडस मुलीला दिला जन्म...मायलेक सुखरूप...सिव्हिल रूग्णालयात उपचार सुरू...

गडचिरोली जिल्ह्यात अंगावर शहारे आणणारा प्रकार... सेल्फीच्या मोहामध्ये वाहनचालकाला गमवावा लागला जीव.. अस्वालाच्या हल्ल्यात वाहनचालकाचा दुर्दैवी मृत्यू....

मुंबईच्या जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उंदीर चावलेल्या तरुणाचा मृत्यू... कोमात असलेल्या परविंद गुप्ताच्या डोळ्याला उंदरानं घेतला होता चावा

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...