Friday, 18 January 2019

भेसळयुक्त मिठाईंपासून रहा सावधान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळीमध्ये गोडधोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईंचा समावेश सर्वाधिक असतो.परंतु सणासुदीच्या काळात रवा, मावा, तेल, बेसन आदी पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

गेल्या काही दिवसांत शहरात एफडीएने धाड टाकून भेसळयुक्त खाद्यतेल, खवा, दूध इ. अन्नपदार्थांचा माल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत नागरिकांनी मिठाई खरेदी करताना अधिक जागरुक राहण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

तसेच नागरिकांनी मिठाई खरेदी करतावेळी दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी.त्यामुळे जर कोणत्या व्यक्तीला विषबाधा झाली असेल तर दुकानदाराला याबाबत दोषी धरता येऊ शकते असे देखील सांगण्यात आले आहे.

दुग्धजन्य पदार्थ घेताना अशी घ्या काळजी - 

  • मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना, ती ताजी आहे की नाही, याची खात्री करावी.
  • बिलाशिवाय मिठाई खरेदी करू नयेत.
  • खवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा.
  • उघड्यावरील मिठाई, खवा खरेदी करू नये.
  • माव्यापासून तयार केलेले पदार्थ २४ तासांच्या आतच खावेत.
loading...