Friday, 18 January 2019

दिवाळी सण साजरा करण्यात झाले 'हे' बदल...

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

भारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात. दिवाळी या सणाला सर्व नातेवाईक एकमेकांच्या घरी येतात आणि शुभेच्छाभेट देत मोठ्या उत्साहात साजरा करतात. तसेच लहानमुले फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. घराघरांमध्ये दिवाळीचे फराळ बनवले जाते आणि शेजारी राहणाऱ्या प्रत्येकाला वाटले जाते. घराबाहेर कंदिलासह दारात रांगोळ्या काढल्या जातात. लोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात अशावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची आनंदमयी संधी घेवून येते.

परंतु दिवाळी सण साजरा करण्याचे स्वरुप काळानुसार बदलत चालले आहे. या सणाचा गोडवा कुठेतरी हरवू लागला आहे. याच एकमेव कारण सोशल मीडिया आहे. 

लोकं सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागले आहेत. तर परदेशात राहणा-या नातेवाईकांना ऑनलाइन भेटवस्तू पाठवल्या जाऊ लागल्या आहेत. 

व्हॉट्सअॅप, फेसबुक, हाइक आदि सोशल मीडियावर दिवाळीचा उत्साह जाणवत असून, स्टिकर्स, मेसेजिंग, इ-ग्रीटिंग्ज, अ‍ॅनिमेटेड ग्रीटिंग्ज व व्हिडीओजमधून शुभेच्छा देत आहेत. थोडा विचार करा आणि या उत्सवाची मजा आंनदाने जगा, आपले जवळचे लोक गमावू नका त्यांना प्रत्यक्षात भेटून हा सण साजरा करा.

 

loading...