Friday, 18 January 2019

दिवाळीनिमित्त सर्व बाजारपेठा सज्ज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळीचा सण आला की सर्व बाजारपेठा सज्ज होतात. दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने सगळीकडे ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठय़ा बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

बाजारात कपडे, फराळ, कंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत.

यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी इकोफ्रेंडली वस्तूंना जास्त प्रमाणात प्राधान्य दिले आहे. टिकल्या,घुंगरु,काच,चकाकणारी चमकी अशा सजावटींच्या वस्तू वापरुन बनवलेल्या डिझायनर पणत्यांना बाजारात जास्त आवक आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक लाल मातीपासून तयार केलेल्या पणत्यांची आवड अजूनही कायम आहे. बाजारात 10 रुपयांपासून ते 250-300 रुपयांपर्यंतचे दिवे विक्रीसाठी आले आहेत. त्याशिवाय रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणा-या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे साचे बाजारात आल्या आहेत.

  • लालमातीचे साधे,छोटे दिव्यांची किंमत - 10 रुपये
  • रंगीबेरंगी पण साधे दिव्यांची किंमत - 20 रुपये
  • चकमकी,काच,मणी इत्यादी पासून सजवण्यात आलेल्या दिव्यांची किंमत - 50 ते 100 रुपयांपासून सुरु
loading...