Friday, 18 January 2019

सर्वसामान्यांची दिवाळी होणार 'अशी' गोडगोड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळी आली की शाॅपिंग, फराळ आणि बऱ्याच काही गोष्टी सर्वसामान्यांच्या डोक्यात फिरत असतात. दिवाळीला पाहुण्यांचा पाहुणचार हा गोडधोड फराळांनी केला जातो, आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांवर सवलत मिळाली तर सोन्याहून पिवळं...

यासाठीच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड होण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

या दिवाळीत प्रत्येकी 1 किलो साखर 20 रुपयांनी रेशनवर मिळणार आहे. तर  2 किलो तूरडाळ, 1 किलो चणाडाळ 35 रुपये आणि 1 किलो उडीद डाळ 44 रुपये प्रति किलोने मिळणार आहे. 

1 कोटी 23लाख  शिधापत्रिकाधारक कुटुंबांना याचा लाभ होणार असून राशन दुकानदारांना यावर दीड रुपये किलो प्रमाणे फायदा मिळणार असून 1 कोटी  50लाख रुपये कमीशन मिळणार आहे. तर याचा फायदा 7 कोटी 16 हजार लाभार्थ्यांना होणार आहे. 

सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या हक्काच्या शिधावस्तूंची (सवलतीतील साखर, डाळ व इतर शिधाजिन्नस ) पावती घेऊनच उचल करावी, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केले आहे.

loading...