Friday, 18 January 2019

दिवाळीत फक्त 2 तासच फोडता येणार फटाके

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली होती. पण न्यायालयाने आता आपल्या आदेशात बदल केला आहे.

राज्यांना फटाके फोडण्यासाठी वेळेत बदल करता येईल, पण कालावधी दिवसातून 2 तासांहून अधिक नसेल, असे न्यायालयाने म्हटंले आहे.

तामिळनाडू, पुद्दुचेरीसारख्या ठिकाणी दिवाळी सकाळी साजरी केली जाते. त्यामुळे तामिळनाडूने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश हा फक्त दिल्ली-एनसीआरसाठीच होता. उर्वरित भारतासाठी नव्हता, हे ही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

तसेच राज्यांना हवे असेल तर ते 2 तासांचा अवधी सकाळी एकतास आणि सायंकाळी एकतास असा विभागू शकता असेही न्यायालयाने म्हटंले आहे. 

loading...