Friday, 18 January 2019

ऐन दिवाळीत बँका राहणार बंद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दिवाळी हा मोठा सण मानला जात असल्याने त्याची तयारीही जोरदार असते. यावर्षी महिन्याच्या सुरूवातीलाच म्हणजे 5 नोव्हेंबरला दिवाळी सण आला आहे. लोकांना खरेदीसाठी पैशांची गरज असताना बँकांना चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन सणांच्या दिवसांमध्ये चार दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे.

जर सणाच्या दिवसांमध्ये बँकांची सुट्टी आली तर लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी दिलेली सुट्टी रद्द करण्यात येते. पण यावेळी दिवाळीनिमित्त बँकांना दोन दिवस सुट्टी असणार आहे. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा असल्याने 7 आणि 8 नोव्हेंबरला बँक बंद असतील. दिवाळी आठवड्याच्या शेवटी आल्याने बँकांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ दुसरा शनिवार आणि रविवारची अधिकृत सुट्टी असल्याने बँका एकूण चार दिवस बंद राहतील. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार भाऊबीजेची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करण्यासाठी तुम्हाला एक दिवस उपलब्ध आहे.

नोव्हेंबर महिन्यात जास्त सुट्ट्या असल्याने बँक कर्मचाऱ्यांची मात्र ही दिवाळी नक्कीच आनंदाची जाणार आहे. या महिन्या बँक कर्मचाऱ्यांना 21 नोव्हेंबर रोजी ईदची सुट्टी असणार आहे. त्याच आठवड्यात 23 नोव्हेंबरला गुरू नानक जयंतीनिमित्त बँका बंद असतील. त्यापुढे सलग दोन दिवस अधिकृत सुट्टीनिमित्त महिन्याच्या चौथ्या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत.

loading...