Friday, 18 January 2019

ऐन दसरा-दिवाळी आधीच सोनं महागलं...

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला. त्यामुळे ऐन दिवाळी-दसऱ्याआधी सोनं महागणार आहे.

मागील 47 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 1400 रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी दहा ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 31 हजार 600 रुपये मोजावे लागले. सातत्याने सुरू असलेली दरवाढ कायम राहणार असून दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 35 हजारांवर पोहोचणार असल्याचे सराफांचे म्हणणे आहे.

महिनाभरापूर्वी सोने 30 हजारांवर होते, तेव्हा बाजारात ग्राहकांची खरेदी वाढली होती. मात्र, भाव वाढताच ते कमी होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबवली, असे असले तरी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी पाहता सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. उलट दसरा, दिवाळीत भाव पुन्हा उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे.

loading...