Tuesday, 22 January 2019

सेन्सेक्सने ओलांडली 35,000 पातळी, आयटीचे शेअर वाढले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

शेअर बाजाराने बुधवारी विक्रमी पातळी गाठण्यात यश मिळवले आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्सने प्रथमच 35000 ची पातळी ओलांडली.

दुपारी शेअर खरेदीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सकारात्मक संकेत पाहायला मिळाले आहेत. 231.73 अंकांनी उसळी घेत दुपारी सेन्सेक्स 35002.78 वर पोहोचला. 26 डिसेंबर रोजी सेन्सेक्सने 34000 ची पातळी गाठली होती. त्यानंतर 17 सत्रांमध्ये सेन्सेक्सने 35000 ची पातळी गाठली आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रासह एफएमजीसी (FMGC) यांचे शेअर वा शेअर बाजाराने ही विक्रमी पातळी गाठली आहे.

एसबीआय, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, यस बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, टीसीएस, आयटीसी लिमिटेड, डॉ. रेड्डीज, सन फार्मा, बजाज ऑटो, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एचडीएफसी लिमिटेड, एमअँडएम आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गती पाहायला मिळाली.

 

loading...