Monday, 21 January 2019

साताऱ्यात अवतरला 'संगीतगणेश' !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

गणपतीची सजावट प्रत्येक जण आपल्या घरात खूप आकर्षक पध्तीने करत असतो. अशीच एक अनोखी गणेशाची सजावट सातारा मधील खणआळी पेठेत राहणारे पदमाकर पाठकजी यांनी आपल्या घरी केली आहे. काही दुर्मिळ आणि आताची अत्याधुनिक वाद्ये, गायकांची छायाचित्रे, ऐकण्याच्या आधुनिक वस्तूचा संग्रह एकत्र करुन गणेशाची अनोखी सजावट केली आहे.

 

पदमाकर पाठकजी यांनी गणेशाच्या सजावटीसाठी २१ वाद्ये जमविण्याचा संकल्प केला. साताऱ्यातील मित्र, नातेवाइक आणि घरात असलेली अशी मिळून 30 पेक्षा जास्त वाद्ये जमली. तंबोरा, सतार, संवादिनी, तबला यांसह दिलरुबा, सनई-चौघडा, जलतरंग, मृदुंग, ट्रम्पेट यांसारखी विविध वाद्ये एकत्र केली. विविध गायक-गायिका, संगीतकार यांची छायाचित्रे जमा केली. घरात असलेली संगीतविषयक पुस्तकेही सजावटीसाठी वापरली आहे.

 

संगीत ऐकण्याच्या माध्यमाचा प्रवासही यात सादर करण्यात आला. ग्रामोफोन, ‘नॅशनल एको’च्या रेडिओपासून ते पेन ड्राइव्हपर्यंत विविध वस्तू संग्रहात एकत्र केल्या आहेत. अगदी दरबारी गायकांपासून ते आजच्या पिढीतील गायक-वादक, संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्‍था यांच्याही नावांचे संकलन करण्यात आले.

 

सजावटीमध्ये वैविध्य आणण्यासाठी वाद्यांच्या छायाचित्रांच्या साहाय्याने सजवलेली दीपमाळ, संगीतातील विविध रागांची कमान, विविध राग आणि तालांपासून तयार केलेला स्वर-ताल वृक्ष अशा विविध गोष्टी घरीच तयार केल्या असून साताऱ्यातील विविध कलाकारांनी विविध वाद्यांचे वादन करणाऱ्या गणेशाची चित्रे साकारली आहेत. ही अनोखी सजावट पाहण्यासाठी अनेक लोक पाठकजी यांच्या घरी भेट देत आहेत.

loading...