Wednesday, 23 January 2019

आया रे सबका बाप रे... ‘ठाकरे’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची प्रमुख भूमिका आणि वादग्रस्त संवादांमुळे चर्चेत असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' सिनेमाच्या म्युझिक लाँचचा सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. 'ठाकरे' सिनेमातील पहिले गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. 'आया रे आया सबका बापरे... कहते उसको ठाकरे' असे या गाण्याचे बोल असून काही मिनिटांतच या गाण्याला यूट्यूबवर हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत, तसेच सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव हे यावेळी उपस्थित होते. हे गाणे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करणारे असून ते नकाश अजीज यांनी गायले आहे. संगीत रोहन-रोहन यांनी दिले आहे. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'ठाकरे' सिनेमातील संगीताचे कौतुक केले. 'हे गाणे मलाही खूप आवडले आहे. मला जेव्हा हे पहिल्यांदा ऐकवले गेले, तेव्हा मला ठेका धरावासा वाटत होता, पण मला काही गोष्टींचे भान ठेवावे लागते,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. ‘ठाकरे’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW