Wednesday, 23 January 2019

करणची कॉफी हार्दिकला पडली महागात, ‘या’ मोठ्या ब्रँडने सोडली साथ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन माघारी बोलावण्यात आले आहे. पांड्या आणि राहुलची कारकीर्द संकटात सापडली असतानाच आता त्यांना आर्थिक फटकेदेखील बसू लागले आहेत. हार्दिक आणि राहुलच्या वादग्रस्त विधानांचा फटका त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूला बसला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्यापासून लांब राहण्याचा विचार करत आहेत.

हार्दिक पांड्याला पहिला फटका जिलेट मार्क 3ने दिला आहे. आक्षेपार्ह विधानामुळे वाद वाढू लागताच जिलेटने पांड्यासोबतचा करार संपुष्टात आणला. 'हार्दिकच्या विधानाशी कंपनीचा कोणताही संबंध नाही. त्याचे विधान आमची मूल्ये दर्शवत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही स्वत:ला त्याच्यापासून वेगळं करत आहोत,' असे स्पष्टीकरण कंपनीच्या प्रवक्त्याने दिले. हार्दिक पांड्या सध्या 7 ब्रँड्सच्या जाहिरातीत दिसतो. तर के. एल. राहुल स्पोर्ट्स वेअरमधील प्रसिद्ध ब्रँड ‘पुमा’ आणि फिटनेस स्टार्टअप क्युअरफिटशी करारबद्ध आहे. या ब्रँड्सनी अद्याप तरी दोघांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 23 04:46:03 +0000 2019

आज 23-01-2019 काय आहे आपलं आजचं राशीभविष्य? वाचा- https://t.co/7m8MsWa9bs #Bhavishya #jyotish #astrology… https://t.co/Ermv6ISpkM
Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP