Wednesday, 23 January 2019

अजय देवगणचा 'तानाजी' लुक पाहिलात का ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अजय देवगणचा सिनेमा 'तानाजी-द अनसंग वॉरियर' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणने त्याच्या फॅन्ससाठी ही भेट दिली आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अजय देवगणचे पोस्टर शेअर केले आहे. यात अजयच्या हातात तलवार दिसत आहे. सिनेमात अजय देवगण तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचे बजेट जवळपास 150 कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. या सिनेमात अजयसोबत सैफ अली खानसुद्धा दिसणार आहे. सैफ शिवाजी महाराजांच्या भूमिकी साकारणार आहे. 'तानाजी-द अनसंग वॉरियर' हा सिनेमा 29 नोव्हेंबर, 2019ला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.  

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Tue Jan 22 17:12:09 +0000 2019

पुण्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान असणारा शनिवार वाडा झाला २८७ वर्षांचा... https://t.co/IGzs6RYkBv #Pune… https://t.co/6nbisn1aFP
Jai Maharashtra News
Tue Jan 22 16:51:57 +0000 2019

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील जागा सोडून नांदेडमधून लढणार? नांदेड काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ? काय आहे या… https://t.co/kIrairDeOW