Friday, 14 December 2018

‘आंख मारे...’ सिम्बा’चं पहिलं गाणं रिलीज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

सारा अली आणि रणवीर सिंग खान यांच्या ‘सिम्बा’ या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘आंख मारे...’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘सिम्बा’चे हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे वो लडकी आंख मारे...’चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवं व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. या गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे. ‘आंख मारे वो लडकी आंख मारे...’ हे ओरिजनल गाणं कुमार सानू यांनी गायले होते.

दिग्दर्शक रोहित शेट्टीने हे गाणं नव्या अंदाजात शूट केलं आहे. अर्थात गाण्यातील डान्स मुव्ह सामान्य आहेत. काही डान्स स्टेप्स तर 80 व 90 च्या दशकातील आहेत. अर्थात यालाही एक कारण आहे. ‘आंख मारे’ हे गाणे मुळातच मस्तीने थिरकायला लावणारे गाणे आहे. त्यामुळे गाण्यात डान्स स्टेप्स सामान्य ठेवण्यात आल्या आहेत. तरीही हे गाणे लोकांना प्रचंड आवडले आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासात हजारो लोकांनी हे गाणं पाहिलं आहे. 

‘सिम्बा’ हा सारा अली खानचा दुसरा चित्रपट आहे. पण ‘आंख मारे’ हे कदाचित साराला मिळालेले तिच्या करिअरमधील पहिले ब्लॉकबस्टर गाणे आहे. यातील रणवीरची जबरदस्त स्टाईलही पाहण्यासारखी आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीर पहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 28 डिसेंबरला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य