Friday, 14 December 2018

प्रियांका-निकच्या लग्नाबाबत ‘द कट’मध्ये वादग्रस्त लेख, टीकेनंतर मागितली माफी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकले. या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्याबद्दल ‘द कट’ या मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या लेखातून प्रियांका आणि निक यांच्या नात्यावर आक्षेपार्ह टीका करण्यात आली असून लेखिकेने प्रियांकाचा उल्लेख ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा केला आहे. प्रियांकाने निकला त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न करायला भाग पाडले असा थेट आरोप लेखिका मारिहा स्मिथने केला आहे.

‘Is Priyanka Chopra and Nick Jonas’s Love for Real?’ या प्रसिद्ध लेखात लेखिका मारिहा स्मिथनं आक्षेपार्ह भाषा वापरत निक आणि प्रियांकाच्या लग्नावर टीका केली आहे. प्रियांका ही ग्लोबल स्टार नसून ती ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट आहे. तिने केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि हॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी निक जोनासशी लग्न केलं. निक, सोफी टर्नर हे ग्लोबल स्टार आहेत यांच्याशी नाते जोडून तिला स्वत:चा फायदा करून घ्यायचा होता म्हणूनच तिने स्वत:पेक्षा वयाने १० वर्षे लहान असलेल्या निकला आपल्या जाळ्यात अडकवले अशा प्रकारची टीका स्मिथ यांनी आपल्या लेखातून केली.

‘निकला प्रियांकाशी लग्न करण्यात रस नव्हता, मात्र प्रियांकाने त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडलं. हे लग्न म्हणजे केवळ या जोडप्यासाठी पैसे कमावण्याचा इव्हेंट होता. हा लग्नसोहळा म्हणजे या जोडप्यासाठी अतिरिक्त कमाई करण्याचे साधन होते. लग्नाचे फोटो विकून त्यांनी ते सिद्धही केलं. प्रियांका जे काही बोलते तो केवळ दिखावा असून तिच्या करिअरसाठी ती सारं करत असते असंही या लेखात म्हटलं होतं, याव्यतिरिक्तही अनेक आक्षेपार्ह टीका या लेखातून करण्यात आल्या होत्या.

हा लेख प्राकशित झाल्यानंतर अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ‘द कट’ मासिकावर टीका करण्यात आली. अभिनेत्री सोनम कपूर आहुजा, सोफी टर्नर, स्वरा भास्कर यांसारख्या अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लेखावर नाराजी व्यक्त केली आहे.

स्मिथ यांच्याजवळ असलेली अपुरी माहिती, चुकीचा दृष्टीकोन आणि मनात आकस ठेवून हा लेख लिहिला आहे असं सर्वांचचं म्हणणं आहे. या मासिकावर जगभरातून टीका होऊ लागल्याने या मासिकाने लेख आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला आहे. लेखातील विचार हे मासिकाचे नसून ते स्मिथ यांचे आहेत. तरीही लेखातून वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही सर्वांची माफी मागतो आणि हा लेख काढून टाकत आहोत असे मासिकाने म्हटले आहे.

 

thecut-priyanka.png

मात्र या वादावर लेखिका स्मिथने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य