Tuesday, 20 November 2018

शाहरूख खानच्या आगामी 'झिरो'चा ट्रेलर रिलीज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आज त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे.त्याच्या वाढदिवसादिनी त्याचा आगामी चित्रपट झिरो'चा ट्रेलर लाॅन्च करण्यात आला आहे.

फार कमी वेळात या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.आता पर्यत या ट्रेलरला अडिज लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे.चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असता शाहरुखची एंट्री लाजवाब आहे असे बोलणे चुकीचे ठरणार नाही.

अंपगत्व असताना देखील आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवणारा चित्रपट असल्याचे ट्रेलर पाहून समजत आहे.या चित्रपटात शाहरुखने बुटक्या माणसाची भूमिका साकरली आहे. लग्नासाठी शाहरुख मुलगी शोधण्याच्या तयारीत असतो आणि मनासारखी साथीदार अनुष्काच्या रुपात मिळते.

अशातच या चित्रपटात वेगळा टिविस्ट पाहायला मिळतो ते म्हणजे कतरिनाशी भेट आणि त्यांच आय़ुष्य एका नवीन वळणार येऊन पोहोचले असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर समजत आहे.

ट्रेलरमध्ये अनुष्काची छोटीशी झलक पाहायला मिळाली असली तरी तिच्या अभिनयाचे सर्व स्थरांवरुन कौतुक होत आहे. तसेच हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार असून चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य