Friday, 18 January 2019

आमीर खानचं 'हे' पात्र आता गुगल मॅपवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बाॅलिवूडस्टार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी करतात. आमिरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ लवकरच म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व टीम सज्ज झाली आहे. त्यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान याने प्रमोशनसाठी अनोखा फंडा वापरला आहे. त्याने चक्क गुगलचीच मदत घेतली आहे.

 ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात आमिरचे पात्र आता लवकरच गुगल मॅपवर दिसणार आहे. त्याचे हे पात्र आता गुगल मॅपवर रस्ते दाखविण्यात मदत करणार आहे.

अॅन्ड्राईड किंवा आयओएस स्मार्टफोन धारकांना हे पात्र गुगल मॅप वापरताना दिसणार आहे.  ‘फिरंगी भल्ला’ गाढवावार बसून वाट दाखवणार आहे.

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिर आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करताना आपल्याला दिसणार आहे. आमिर आणि अमिताभ बच्चन सोबतच कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jan 17 17:04:36 +0000 2019

आज 18-01-2019 आपलं आजचं राशीभविष्य जाणून घेण्यासाठी करा पुढील लिंकवर क्लिक- https://t.co/AEHgpgudhI #zodiacsigns… https://t.co/SCqyx29qhr
Jai Maharashtra News
Thu Jan 17 16:54:53 +0000 2019

प्रजासत्ताक दिनानिमित्त #Flipkart खास ऑफर्स... स्मार्टफोनवर दणदणीत सूट... https://t.co/EZt33NFyn5 #RepublicDay… https://t.co/dwV5iyDPqW