Tuesday, 20 November 2018

शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या बर्थडे दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.

शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही अनोखी भेट असणार आहे. त्याआधी शाहरुखने या चित्रपटाचे 2 पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर पाहून चाहत्यांच्या मनात शाहरुखच्या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. तर दुसऱ्या पोस्टरमधून त्याने अनुष्काची वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली आहे.

ती म्हणजे‘इस पुरी दुनिया मै मेरी बराबरी की एक ही तो है’ असं लिहित अनुष्कासोबतचा दुसरा पोस्टर शाहरुखने सोशल मिडियावर शेअर केला आहे. येत्या 31 डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य