Tuesday, 18 December 2018

'या' अभिनेत्रीला डेंग्यूची लागण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेत्री श्रद्धा कपूर 'स्त्री' चित्रपटानंतर ती टेनिस स्टार सायना नेहवालवरील आधारित चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटांबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागलीय. परंतू श्रद्धाला डेंग्यू झाल्याने आता सगळेच शुटींग तिला रद्द करावे लागले.

श्रद्धा कपूरची तब्बेत खूप दिवसांपूर्वी बिघडली. अखेर वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर, श्रद्धाला डेंग्यूची लागण झाल्याच कळाले. यामुळे श्रद्धाने चित्रपटाचे शुटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती डेंग्यूचा आजार बरा होईपर्यंत आराम घेणार आहे. लवकरच ती पुन्हा बरी होऊन सेटवर येईल असे सांगितले. परंतू आता सायनाच्या बालपणाचे काही सीन चाइल्ड आर्टिस्टसोबत शूट केले जात आहे. असे सूत्रांनी सांगितलं.

सायनाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहे. श्रध्दाने सायनाची भूमिका साकारण्यासाठी 40 बॅडमिंटन क्लासेस ही घेतलेत. बॅडमिंटन हा खेळ फारच कठीण असल्याचे ती सांगतेय. परंतू मी याचा आनंद घेत आहे. कारण प्रत्येक खेळाडूचा अनुभव खूप वेगळा असतो. खेळाडूच्या तोडीस तोड भूमिका निभावण्यासाठी खेळाडूचा त्याग, समर्पण, त्याला लागलेला मार आणि त्यातून मिळालेला विजय या सगळ्याच गोष्टी बारकाव्याने जाणून घ्यावे लागले आहेत. या परिस्थितीत सिनेमाचं संपूर्ण यूनिट श्रद्धा कपूरला सपोर्ट करत आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य