Tuesday, 18 December 2018

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारीत ''आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महान अभिनेत्याला वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत या  चित्रपटाचं टिझर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या चित्रपटात रंगभूमीचा तो सुवर्णकाळ उभा करण्यात आला असून 'पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट, रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…, अशा कॅप्शनमुळे तर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची घाणेकरांची शैली  अद्वितीय होती. 

 • मराठी व्यावसायिक रंगभूमीला मोठं योगदान
 • अनेक तरुण अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी

या नाटकांमधील त्यांच्या गाजलेल्या भूमिका

 • रायगडाला जेव्हा जाग येते,
 • इथे ओशाळला मृत्यू,
 • अश्रूंची झाली फुले,
 • गारंबीचा बापू,
 • आनंदी गोपाळ,
 • शितू,
 • तुझे आहे तुजपाशी,
 • सुंदर मी होणार,
 • मधुमंजिरी 

या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका साकारणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

पाहा हा टिझर -

loading...

Top 10 News

राशी भविष्य