Tuesday, 18 December 2018

‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा ट्रेलर तुमच्यासमोर हाजीर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

यशराज फिल्मने ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ, फातिमा शेख अशी भन्नाट स्टार मंडळी दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आपल्यांना पाहायला मिळणार आहे. इंग्रज हळूहळू आपल्या देशात कसे आले आणि व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांनी आपल्याच देशाला कसं गुलाम बनवलं हे या चित्रपटात पाहायला मिलणार आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरमधून 1795 च्या युद्धातला काळ, फिरंगी विरुद्ध आझाद हा सामना या चित्रपटात रंगताना दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच बिग बी 'खुदाबक्ष' या अवतारात दिसत आहे. या चित्रपटाची कथा फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे.

चित्रपटात बिग बी ‘आजाद, ठग्सच्या सेनापती’ ही भूमिका साकारत आहे. तर आमीर खानचा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियनमधल्या जॅक स्पॅरो’ या व्यक्तिरेखेसारखा दिसतोय. हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नक्की या चित्रपटात काय दाखवले जाणार आहे, याची जिज्ञासा प्रेक्षकांना लागली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला टांगलीय.

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य