Tuesday, 18 December 2018

‘बाझार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेता सैफ अली खानचा ‘बाझार’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच सैफ अली खानने सोशल मीडियावर ‘बाझार’ चित्रपटांचा ट्रेलर प्रदर्शित केला. यामध्ये सैफ अली हा शकुन कोठारीची भूमिका साकारणार आहे.

‘बाझार’ चित्रपटामध्ये सैफचा एक डायलॉग प्रचंड लोकप्रिय झालाय. ‘बडा आदमी बनना है तो लाइन क्रॉस करनी होगी’ असे वाक्य सैफने या चित्रपटात म्हटले आहे. या चित्रपटात सैफ अली बरोबर अभिनेत्री राधिका आपटे आणि चित्रांगणा सिंग ही जोडी दिसणार आहे. तसेच एक नविन चेहराही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रोहन मेहरा हा नविन चेहरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

या चित्रपटामध्ये एका स्वार्थी व्यावसायिकाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ट्रेलर बघून आता प्रेक्षकांना ‘बाझार’ चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य