Tuesday, 18 December 2018

नाना पाटेकरांकडून गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

‘झूम टीव्ही’च्या मुलाखतीत 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्रीने हा गौप्यस्फोट केला आहे.

 तनुश्रीने केलेला खळबळजनक खुलासा

 • 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं.
 • त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते.
 • चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणं अपेक्षित होतं.
 • मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगेल तसं करण्यास सांगितलं होतं, असा खळबळजनक खुलासा तनुश्रीने या मुलाखतीत केला आहे.
 • बॉलिवूडमधील अनेकांना नाना पाटेकर महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात हे माहीत आहे.
 • याशिवाय त्यांनी महिला कलाकारांना सेटवर मारहाण केल्याचंही प्रकरण घडलं आहे.
 • पण यावर बोलायची कुणाची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली.
 • इतकंच नाही तर नाना पाटेकर यांनी गुंड बोलावून मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावल्याचंही तनुश्रीने सांगितले आहे.

   तनुश्री दत्ता हिने 2005 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'आशिक बनाया आपने' सिनेमातून ती प्रकाशझोतात आली होती.

  त्यानंतर तनुश्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केले, मात्र 2010 पासून तनुश्री बॉलिवूडपासून दूर आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य