Saturday, 17 November 2018

हृतिक रोशन घेणार कंगणा राणौतशी पंगा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटांची तारीख लांबणीवर जाणार असा अंदाज होता. पण या चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

हृतिकचा ‘सुपर30’ हा आगामी चित्रपट तर कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ सोबत रिलीज होऊ नये, असे हृतिक रोशनची इच्छा असल्याची बातमी मध्यंतरी आली.

काल रात्रीच हृतिकचा ‘सुपर30’चा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आला. यानंतर आज सकाळी या चित्रपटाचे दोन नविन पोस्टर्सचा लूकही प्रेक्षकांच्या भेटीस आला.

ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून हृतिकचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार असा खुलास केला. तसेच हृतिक व कंगनाचा बॉक्स ऑफिस संघर्ष रंगणार, हे स्पष्ट झाले.

दिग्दर्शक विकास बहल या चित्रपटात हृतिक रोशन एका नॉन ग्लॅमरस भूमिकेत  एका गणित तज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या या दोन्ही पोस्टर्सने चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणलीय. याचबरोबर हृतिक विरूद्ध कंगना हा सामना कसा रंगणार आणि यात कोण बाजी मारणार,  असे अनेक प्रश्न लोकांना आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य