Saturday, 17 November 2018

प्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांवर ओढावलं संकट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या साखरपुड्यानंतर तिच्या चाहत्यांना प्रियंका आणि निक विवाहबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मात्र यादरम्यान निकचे वडील आणि प्रियांकाचे होणारे सासरे पॉल जोनास यांच्या कर्जबाजारीपणाची एक माहीती समोर आली आहे.

पॉल जोनास यांच्या एका रियल इस्टेट कंपनी वर एक मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 7 कोटी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.

ज्यामध्ये 2 लाख 68 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास एक कोटी 90 लाख रुपयांचा दावा असलेला एक खटलाही समाविष्ट आहे. हा खटला त्यांची कंपनी हरली होती.

त्यामुळे पॉल जोनास आता पैशांसाठी आपली न्यूजर्सी कन्स्ट्रक्शन आणि रियल इस्टेट कंपनीची संपत्ती विकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

यापूर्वी निक सोबत जोनास ब्रदर्सनी 2013 मध्ये बॅण्ड बंद होण्याआधी जगभरात आपले लाखो रेकॉर्डस् विकले होते. त्यानंतर त्यांनी वैयक्तिक काम करायला सुरुवात केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य