Saturday, 15 December 2018

बाहुबलीतली ही अभिनेत्री वेबसरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बाहुबलीतल्या माहेश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांच्यावर आधारित सिरिज नेटफ्लिक्स आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २; या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. एकट्या ‘बाहुबली २’ नं भारतात जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवला. आता या चित्रपटाचा आणखी एक प्रिक्वल वेबसरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यातून उलगडले जाणार आहेत. त्यासाठी राजामौली यांनी आर्का मीडिया वर्क्स आणि नेटफ्लिक्सशी करार केला आहे. दरम्यान, या वेबसिरीजमध्ये कलाकार म्हणून कोण असणार, याबाबत सध्या कोडंचं आहे.

एकूण ९ भागांची ही वेबसिरिज असून यातून माहेश्मती साम्राज्याच्या सम्राज्ञीची कधीही न ऐकलेली कहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्यूजन’ या दोन्ही चित्रपटातून अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळल्या होत्या.

बाहुबली चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक विशिष्ट ओळख आहे. बाहुबली, कटप्पा, शिवगामी हे तीन पात्र विसरणे तर प्रेक्षकांना शक्यच नाहीत. तर शिवगामीची भूमिका करणाऱ्या राम्यानेही कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य