Saturday, 15 December 2018

इरफान खान म्हणाला 'शुक्रिया जिंदगी'...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा इरफानचा ‘कारवाँ’ हा चित्रपट उद्या 3 ऑगस्टला (शुक्रवारी) प्रदर्शित होणार आहे. चाहते उत्सुकतेने त्याच्या चित्रपटाची वाट पाहत असताना दुसरीकडे ते सतत त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. इरफान खान या दिवसांत लंडनमध्ये असून न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरवर उपचार करत आहेत. दरम्यान, त्यानी एक मुलाखत दिली आहे आणि त्यांना त्याची त्याने त्याच्या उपचाराविषयीचे काही अपडेट्स दिले आहेत. 

'दुर्धर आजाराने ग्रासल्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. आता मी कोणत्याही गोष्टी ठरवून करत नाही किंवा माझे काहीच प्लॅन्स नाहीत. मला कोणत्याही क्षणी मृत्यूच्या दारी जावे लागू शकते' असं अभिनेता इरफान खान म्हणतोय.

‘किमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. सहा पूर्ण सेशन होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण तेव्हाच निकाल लागेल आणि मग पाहुयात आयुष्य मला कुठे घेऊन जातं ते,’ असं तो म्हणाला. त्यामुळे इरफानचे चाहते त्याच्यासाठी एकीकडे प्रार्थना करत असताना ही गोष्ट दिलासा देणारी आहे.

‘आता मी कोणतेच प्लॅन्स करत नाही. कारण जीवनात कसलीच निश्चिती नाही. मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होतं. पण माझ्या हातात काहीच नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. मला कोणत्याही मृत्यूच्या दारी जावे लागू शकेल. मग ते काही महिन्यांनी असो किंवा वर्षाने किंवा दोन वर्षांनी. जीवनाची कसलीच शाश्वती नाही. पण या परिस्थितीने मला खूप काही शिकवलं आहे. तुम्ही भविष्याचा विचार करणं, प्लॅनिंग करणं सोडून देता. तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे पाहायला लागता. आयुष्य खूप काही देतं आणि यासाठी आपल्याला आभारी असायला हवं.’ अशीही  भावना इरफानने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य