Tuesday, 21 August 2018

बाॅलिवूडच्या शहंशाहला आजच्या दिवशीच मिळाला होता पुनर्जन्म...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बाॅलिवूडच्या शहंशाहला आजच्या दिवशीच पुनर्जन्म मिळाला होता. बॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘कुली’ या चित्रपटामध्ये केवळ अमिताभ बच्चन यांच्या अभिनयसोबतच चित्रीकरणावेळी त्यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती. 

या दिवसाची आज बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा आठवण करुन दिली आहे. आजच्याच दिवशीच हा अपघात झाल्यामुळे त्यांनी माझा पुनर्जन्म झाल्याचं म्हटलं आहे. 

त्यावेळी अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी नवस देखील केले होते. या दिवसाची आज बिग बींनी आठवण ताजी करुन ट्विट केलं आहे. आजच्याच दिवशीच हा अपघात झाल्यामुळे त्यांनी माझा पुनर्जन्म झाल्याचं म्हटलं आहे.  

‘३६ वर्षांपूर्वी याच दिवशी ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर माझा अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न आणि चाहत्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे मी आजचा दिवस पाहत आहे. तो आजचाच दिवस होता २ ऑगस्ट ज्या दिवशी मला पुनर्जन्म मिळाला आणि हे सारं तुमच्या प्रार्थनेमुळेच शक्य झालं’, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं. 

‘कुली’ चित्रपटादरम्यान काय घडलं होतं?

  • जुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एक साहस दृश्य करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती.
  • त्यामुळे त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार करण्यात येत होते.
  • दरम्यान, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. 
  • मात्र त्यावेळी  बाळासाहेब ठाकरे हे अमिताभ यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.
  • बंगळुरुमधील रुग्णालयातून मुंबईत आलेल्या बिग बींना ब्रीच कँडीमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती.
  • मात्र मुसळधार पावसामुळे एकही रुग्णवाहिका त्यांना नेण्यास तयार नव्हती.
  • या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती.
  • त्यामुळेच अमिताभ यांच्यावर उपचार होऊ शकले, असं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाचा टिझरच्यावेळी सांगितलं होतं.
loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:29:40 +0000 2018

केरळमधला प्रलय नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित? लाखो लीटर पाणी शहरांमध्ये शिरण्याला जबाबदार कोण? पुराची आधीच भविष्य… https://t.co/ieBEjH2Lib
Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:07:46 +0000 2018

निकसह सासू सासऱ्यांसोबत प्रियंकाने दिली अनाथाश्रमाला भेट - https://t.co/VB0siuSHKK #PriyankaNickEngagement… https://t.co/i1cgEJ1yp1

Facebook Likebox