Saturday, 15 December 2018

हरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

हरियाणातील मेवातमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. एका गरोदर बकरीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच त्या बकरीचा मत्यू झाला.

भारतासारख्या विकसनशील देशात महिला, मुलं आणि जनावरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनंही टि्वटरच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत संपात व्यक्त केला आहे.

''देशात आतापर्यंत महिला आणि लहान मुले भीतीच्या सावटाखाली जगत होते. मात्र आता बकरी आणि कुत्रेदेखील अशा घटनांचे शिकार होऊ लागले आहेत. आपल्या उत्क्रांती आणि शिक्षणात गंभीर स्वरुपात काही तरी चुकीचे घडत आहे. हे सर्व कधी संपुष्टात येणार, माहिती नाही'', अशा शब्दांत फरहाननं आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला आहे.
  • हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर असलेल्या बकरीवर आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार
  • बकरीच्या मालकानं 26 जुलैला या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली.
  • ते सर्व आरोपी फरार
  • याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य