Saturday, 15 December 2018

कंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी इथे करतेय प्रार्थना...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   

बॉलीवुडची क्वीन कंगना रनौत सध्या तीच्या ‘मणिकर्णिका’ या पुढील चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाचा हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऐतिहासिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. तसेच कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटात कंगनाचा अनोखा अंदाजही पाहायला मिळणार आहे.

चित्रपट रिलीज होण्याआधी कंगना तमिलनाडूच्या ‘कोयंबटूर’ येथे गेली होती. मात्र कंगना या ठिकाणी एका विशिष्ट गोष्टीकरिता गेली आहे.

या ठिकाणी कंगना आदिशक्ती आश्रममध्ये ध्यानलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. येथील शंकराची पूजा करतानाचे कंगनाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

कंगनाचा मणिकर्णिका हा चित्रपट ऋतिक रोशनच्या 'सुपर 30'  या चित्रपटासह 25 जानेवारीला रिलीज होणार आहे.

या दोघांमध्ये असलेल्या वैयक्तिक आयुष्यातील वादविवादानंतर प्रथमच या दोन स्टारर्सचे चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य