Tuesday, 21 August 2018

रितेशच्या 'माऊली'चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवुडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ‘लय भारी' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आज म्हणजेच सोमवारी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

रितेशने आपल्या मराठी चित्रपटाचा हा पोस्टर सोशल मिडियावर शेअर केला आहे. रितेशच्या या नवीन मराठी चित्रपटाचे नाव 'माऊली' असून चित्रपटाच्या रिलीजची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

यावर्षी 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रितेश आणि जेनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनी या होम प्रॉडक्शनमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

क्षितिज पटवर्धन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर अजय-अतुल या चित्रपटाचे संगीतकार आहेत.

तसेच या चित्रपटात रितेशसह अभिनेत्री सयामी खेर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:29:40 +0000 2018

केरळमधला प्रलय नैसर्गिक आपत्ती की मानवनिर्मित? लाखो लीटर पाणी शहरांमध्ये शिरण्याला जबाबदार कोण? पुराची आधीच भविष्य… https://t.co/ieBEjH2Lib
Jai Maharashtra News
Mon Aug 20 16:07:46 +0000 2018

निकसह सासू सासऱ्यांसोबत प्रियंकाने दिली अनाथाश्रमाला भेट - https://t.co/VB0siuSHKK #PriyankaNickEngagement… https://t.co/i1cgEJ1yp1

Facebook Likebox