Saturday, 15 December 2018

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली मेघा धाडे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली आहे मेघा धाडे बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची सुरुवात 3 महिन्यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर झाली होती.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनचं कार्यक्रमामध्ये कोण असणार, याचे सूत्रसंचालन कोण करणार आणि महत्वाचं म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांमध्ये पाहायला मिळाली होती.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पडला. बिग बॉस मराठी अंतिम सोहळ्याचा तो क्षण शेवटी आलाचं, ज्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली होती.

मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली तर पुष्कर जोगने दुसरे स्थान पटकावले.

मेघा धाडेला 18 लाख 60 हजार रुपये इतकी धनराशी मिळाली तर खोपोली येथेNirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिककडून एक घरही मिळालं आहे.   

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य