Sunday, 18 November 2018

रितेशच्या माफीवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया...

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

य महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर आधारित मराठी चित्रपटाची निमिर्ती करत असल्याची बातमी प्रेक्षकांसाठी नवीन नाही तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या सिनेमाच्या टीमने काल म्हणजेच 5 जूनला रायगडाला भेट दिली असून.

यावेळी काढलेले काही फोटो रितेशने आज पहाटेच्या सुमारास आपल्या ट्विटरवर शेअर केले. मात्र या फोटोंवर शिवभक्तांनी संताप व्यक्त करत रितेशला खडे बोल सुनावले.

शिवभक्तांनी या फोंटोवर संताप व्यक्त केल्यानंतर रितेशने हे फोटो आपल्या ट्विटवरवरून डिलीट केले असून याबाबत रितेशने सर्वांकडून माफी मागितली.

मात्र रितेश देशमुखच्या या फोटोंवर आता संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजेंनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन फोटोसेशन करणं खरोखरच निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली. तसेच आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून, त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील, असंही नमूद केलं. संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य