Saturday, 15 December 2018

अॅथलिट दिशा भारत मध्ये जिमनास्टच्या भूमिकेत...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दिशा पटनी हिला टायगर श्रॉफबरोबर काम करणारी अभिनेत्री म्हणून सगळेच ओळखतात. मात्र ती ऍथलिट म्हणून देखिल प्रसिध्द आहे, ते फार कमी लोकांना माहित असेल.

टायगर बरोबर राहून ती फिटनेसबद्दल देखिल जागरुक असताना दिसून येत आहे. दिशाचा खेळाकडे असलेला झुकाव आणि आरोग्यबद्दलची सजगता पाहून तिचे सोशल मिडीयावर फॉलोअर देखिल तुफान आहेत.

हल्ली दिशाचे लक्ष मात्र सलमान खान आणि प्रियांका चोपडा अभिनीत 'भारत' या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामध्ये ती वेगळ्या प्रकारच्या जिमनास्टच्या भुमिकेत दिसून येईल.

आगामी ईद दरम्यान प्रदर्शित होणारया या चित्रपट निमित्ताने दिशा सुखावली नसल्यास नवल.

‘बागी २’ च्या दमदार यशानंतर दिशाच्या वाट्याला ‘भारत’ या चित्रपटाच्यानिमित्तानं मोठी संधी चालून आली आहे.

२५ वर्षांची दिशा या चित्रपटात १९६० च्या सुमारास सर्कसमध्ये काम करणाऱ्या ट्रिपेझ आर्टिस्टची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी जसा चेहरा हवा होता तो दिशाचा आहे. ती अॅथलिटदेखील आहे त्यामुळे या चित्रपटासाठी ती योग्य असल्याचं दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी सांगितलं.

सुरुवातीला या चित्रपटात दिशा फक्त कॅमिओ रोल करेन अशा चर्चा होत्या पण तिची भूमिका यापेक्षा अधिक असेल असं म्हटलं जात आहे.

सलमानसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे असं म्हणत तिनं याचा आनंद व्यक्त केला आहे. सलमान आणि दिशा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. 

दिशा पाटणीच्या त्या फोटोला वेब पोर्टलने म्हटले कुरुप, न्यूज पोर्टलला दिशाने दिले सडेतोड उत्तर

loading...

Top 10 News

राशी भविष्य