Saturday, 15 December 2018

देसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था न्यूज, दिल्ली

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरचं आपल्यापेक्षा 10 वर्ष लहान असलेला अमेरिकन गायक-अभिनेता निकजोनससोबत साखरपुडा करणार आहे. निक जोनस आणि प्रियंकाच्या प्रेमाची चर्चा जगभरात सुरु आहे.

भारत दौऱ्यावर आलेलं हे जोडपं पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार असल्याचा दावा ग्लॅमर मॅगझीन फिल्मफेअरने केला आहे.

फिल्मफेअर मॅगझीननुसार जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये प्रियांका निक जोनससोबत इंगेजमेंट करणार आहे. हा साखरपुडा ठरवण्यासाठीचं प्रियांका जोनला आपल्या कुटूंबीयांना भेटवण्यासाठी भारतात घेऊन आली आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात प्रियंका आणि निक साखरपुडा करण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच प्रियंकाने निकच्या नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी जोनस कुटुंबासोबत तिची गाठभेट झाली. त्यानंतर प्रियंका आणि निक 21 जूनला मुंबईत आले.

सध्या प्रियांका निकसोबत गोव्यामध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे.  

प्रियंका – निक जोनची भेट

प्रियंकाने भूमिका साकारलेल्या 'काँटिको' मालिकेतील सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स याने प्रियंका आणि निकची ओळख करुन दिली. निकने स्वत: ही माहिती एका मुलाखतीत दिली होती.

'न्यू यॉर्कमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर 'मेट गाला विथ राल्फ लॉरेन' या कार्यक्रमाला योगायोगाने आम्ही जाणार होतो. तेव्हा आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. ती खूप प्रेमळ आहे.

पासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट

नेटवर्क नसतानाही WiFi Calling...

हॅप्पी बर्थडे LOLO...

साऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...

'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अर्जून कपूरने मागितली जान्हवीची माफी... 

loading...

Top 10 News

राशी भविष्य