Saturday, 15 December 2018

अनुष्का संतापली अन् विराटनं शेअर केला व्हिडीओ...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशांना चांगलचं फटकारलं आहे. अनुष्का विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत होती.

तेव्हा समोरच्या गाडीतील व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली. त्यावर संताप व्यक्त करत अनुष्काने त्यांना दम दिला आणि पुन्हा असं न करण्यास सांगितलं.

विराटने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुष्का आलिशान कारमधील युवकाला दम देताना दिसत आहे.

अनुष्काने आपल्या कारच्या काचा खाली घेऊन तरुणाला बाटली रस्त्यावर फेकल्याबद्दल चांगलचं सुनावलं आहे. तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकत आहात ? तुम्ही प्लास्टिकची बाटली का फेकली ? यापुढे असं करु नका, तुम्ही रस्त्यावर अशाप्रकारे कचरा फेकू शकत नाही, असं अनुष्काने कचरा फेकणाऱ्या तरुणाला सुनावलं.

विराट कोहलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबतचं विराटनं एक पोस्टही केली आहे. ज्यामध्ये विराटनेही महागड्या गाड्यांमध्ये फिरुन रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणांबद्दल संताप व्यकत केला आहे, आणि जर तुम्हीही असा चुकीचा प्रकार घडताना पाहिला तर याबबाबत लोकांना जागरूक करा असं आवाहन विराटनं सर्वांना केलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य