Thursday, 18 October 2018

प्रियंकाच्या ‘क्वाटिंको’ मालिकेवर भारतीयांनी व्यक्त केला संताप...

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पण यावेळी प्रियंकावर तिचे फॅन्स संतापले असून प्रियंका चोप्राच्या क्वांटिको या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण नुकताच क्वांटिको कार्यक्रमाच्या तीसऱ्या सीजनचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. ज्यामध्ये काही भारतीयांना दहशतवादींच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे.

यामध्ये हे भारतीय बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत असल्याचे दाखवले आहे, पण यामध्ये भारतीयांचा हेतू पाकिस्तानला दोषी ठरवण्याचा आहे. असं दृश्य या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रियंकाचे फॅन्स आणि इतर भारतीयांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रियंकावर संताप व्यक्त केला आहे.

या एपिसोडमध्ये दाखवलेल्या या दृश्यावर संताप व्यक्त करत प्रियंकाला लोकांनी सोशल मिडियावर ट्रोल केलं आहे. ज्यामध्ये काहीजण म्हणाले आहेत की हा एपिसोड भारताची बदनामी करण्याचा कट आहे, तर एक यूजर म्हणाला आहे की 'आता मला कळालं की प्रियंका चोप्रा रोहिंग्या मुस्लिमांचं सर्मथन का करत होती'. क्वाटिंकोचा हा एपिसोड पाहून अनेकजण प्रियंकावर नाराज झाले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य