Friday, 20 July 2018

Happy Birthday 'धकधक गर्ल'

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन, डॅशिंग दिवा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज 51 वा वाढदिवस आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईत जन्मलेल्या माधुरीचा जादू आणि करिष्मा अजूनही टिकून आहे. मधुबाला म्हणा किंवा बॉलिवूडची मर्लिन मुनरो, माधुरी दीक्षितने जवळजवळ दोन दशकं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं आहे. सहसा अभिनेत्रींचं फिल्मी करिअर दहा वर्षांपेक्षा जास्त नसतं. केवळ अभिनेतेच लांबचा पल्ला गाठतात असेही म्हटले जाते. मात्र माधुरी या सगळ्याला अपवाद आहे.

व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बऱ्याच सिनेमांमध्ये तिने काम केले. शिवाय ती आजही छोटा पडदा गाजवत आहे. माधुरी दीक्षितच्या अदांनी आजही लाखो चाहते घायाळ होत असतील यात काही शंका नाही. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाटेल ते करायला आजही तयार होतात.तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला.

15 मे 1967 रोजी माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला.त्यानंतरची माधुरीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सर्वश्रूत आहेतच. या सर्व घटनेनंतर माधुरीने 1984 मध्ये ‘अबोध’ सिनेमातून पदार्पण केले. 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला. माधुरीला दोन मुलं असून ती आपल्या संसारात फार सुखी आहे.

सध्या‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून माधुरी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्यानं चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. madhuri_dixit_birthday.jpg

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jul 20 08:11:02 +0000 2018

गदरोळानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित - https://t.co/wPOGdtMDYz #JMBreaking #पाहाJMLive https://t.co/yxl3jGdwV7
Jai Maharashtra News
Fri Jul 20 08:08:40 +0000 2018

मोदींच्या दबावाखाली राफेलच्या किंमती वाढवल्या - राहूल गांधी - https://t.co/wPOGdtMDYz #पाहाJMLive https://t.co/bvW3UaxBFC

Facebook Likebox