Tuesday, 22 May 2018

मुलींचा सुपर परफॉर्मन्स बघून दोन वडिलांची गळा भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातील आपल्या मुलीचं काम बघून दोन वडिलांनी गळा भेट घेत असतानाचा भावनिक फोटो महेश भट्ट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आलिया भट्टचे वडील महेश भट्ट आणि मेघनाचे वडील गुलजार यांनी आपल्या मुलींचं काम बघून भावूक झाले आणि एकमेकांची गळाभेट घेतली. आपल्या मुलांचा सुपर परम्फॉर्मन्स बघून जेव्हा दोन वडील गळाभेट घेतात असं कॅप्शनही महेश भट्ट यांनी दिलं आहे. 'राझी' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता विकी कौशल हे मुख्य भुमिकेत आहेत.

   मेघनाच्या 'तलवार'नंतर राझी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आलियाने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा तीच्या चाहत्यांवर भुरळ पाडली आहे. या सिनेमात आलिया एका गुप्तहेर स्त्रीच्या भुमिकेत आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धासंदर्भातली ही कथा आहे. आपल्या देशापुढे आणि कर्तव्यापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणाऱ्या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा मेघना गुलजारने मांडली आहे.

 

 

loading...

Top 10 News

Facebook Likebox

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon May 21 15:59:22 +0000 2018

दंगलकारण... ग्राऊंड झिरो... https://t.co/FFhWkNrpjw
Jai Maharashtra News
Mon May 21 15:57:26 +0000 2018

फेरीवाल्यांचा फेरा... https://t.co/afKg0YkRmr